श्रीएकनाथी भागवत

ज्ञानेश्वरीतील उणीव एकनाथी भागवताने भरून काढली.


श्लोक ४२ वा

एवं प्रश्नमृषीन्पूर्वमपृच्छं पितुरन्तिके ।

नाब्रुवन् ब्रह्मणः पुत्रास्तत्र कारणमुच्यताम् ॥४२॥

पूर्वीं हाचि प्रश्नु सनकादिकां । पित्यासन्निध पुशिला देखा ।

ते उत्तर नेदितीचि कां । हेही आशंका फेडावी स्वामी ।

रायाचे प्रश्न अतिपवित्र । त्यांचें द्यावया प्रति‍उत्तर ।

हरिखावला ’आविर्होत्र । तो कर्मवैचित्र्य निरूपी ॥७५९॥