श्रीएकनाथी भागवत

ज्ञानेश्वरीतील उणीव एकनाथी भागवताने भरून काढली.


श्लोक १४ वा

ये त्वनेवंविदोऽसन्तः स्तब्धाः सदभिमानिनः ।

पशून्द्रुह्यन्ति विस्त्रब्धाः प्रेत्य खादन्ति ते च तान् ॥१४॥

नेणोनि शुद्ध वेदविधानातें । अतिगर्वाचेनि उद्धतें ।

आपणियां मानूनि ज्ञाते । अविधी पशूतें घातु करिती ॥७७॥

केवळ अभिचारमतें । पावोनि सकळ भोगातें ।

ऐशिया मानोनि विश्र्वासातें । स्वेच्छा पशूतें घात करिती ॥७८॥

अविधी पशूतें वधिती । त्या याज्ञिकांचे देहांतीं ।

मारिले पशू मारूं येती । झळकत काती घेऊनियां ॥७९॥

एवं निमालिया याज्ञिकांसी । भक्षिले पशु भक्षिती त्यांसी ।

जैसें सेविलें विष प्राणियांसी । ग्रासी प्राणांसी समूळ ॥२८०॥