श्रीएकनाथी भागवत

ज्ञानेश्वरीतील उणीव एकनाथी भागवताने भरून काढली.


श्लोक २७ वा

द्वापरे भगवान्‌ श्याम:, पीतवासा निजायुधः ।

श्रीवत्सादिभिरङकैश्च, लक्षणैरुपलक्षितः ॥२७॥

द्वापरीं घनश्यामवर्ण । अतसीपुष्पप्रभासमान ।

पीतांबरपरिधान । श्रीवत्सचिन्ह‍अंकित ॥३२॥

शंख-चक्र-पद्म-गदा । चारी भुजा सायुधा ।

इहीं लक्षणीं गोविंदा । लक्षिती सदा निजभक्त ॥३३॥