श्रीएकनाथी भागवत

ज्ञानेश्वरीतील उणीव एकनाथी भागवताने भरून काढली.


श्लोक ४९ वा

माऽपत्यबुद्धिमकृथाः, कृष्णे सर्वात्मनीश्वरे ।

मायामनुष्यभावेन, गूढैश्वर्ये परेऽव्यये ॥४९॥

तुम्ही बाळकु माना श्रीकृष्ण । हा भावो अतिकृपण ।

तो परमात्मा परिपूर्ण । अवतरला निर्गुण कृष्णावतारें ॥३१॥

यासी झणें म्हणाल लेंकरूं । हा ईश्र्वराचा ईश्र्वरु ।

सर्वात्मा सर्वश्र्वरु । योगियां योगींद्रु श्रीकृष्ण ॥३२॥

हा अविकारु अविनाशु । परात्परु परमहंसु ।

इंद्रियनियंता हृषीकेशु । जगन्निवासु जगदात्मा ॥३३॥

मायामनुष्यवेषाकृती । हा भासताहे सकळांप्रती ।

गूढ‍ऐश्र्वर्य महामूर्ती । व्यापक त्रिजगतीं गुणातीतु ॥३४॥