श्रीएकनाथी भागवत

ज्ञानेश्वरीतील उणीव एकनाथी भागवताने भरून काढली.


श्लोक २३ वा

अवतीर्य यदोर्वंशे बिभ्रद्रूपमनुत्तमम् ।

कर्माण्युद्दामवृत्तानि हिताय जगतोऽकृथाः ॥२३॥

पूर्णपुरुषा हृषीकेशी । तूं अवतरलासी यदुवंशीं ।

सीमा तुझिया रूपासी । बरवेपणासी न करवे ॥४६॥

तूं सर्वांमाजीं सर्वोत्तम । देखतां वृत्तींसी उपरम ।

लीलाविग्रही पुरुषोत्तम । मनोरम सकळिकां ॥४७॥

कर्में केलीं परमाभ्दुतें । गोवर्धन धरिला वाम हस्तें ।

मुखें प्राशूनि वणव्यातें । गोपाळांतें वांचविलें ॥४८॥

मृता आणिलें गुरुपुत्रासी । गत गर्भ भेटविले देवकीसी ।

गोपालवत्सें तूं जाहलासी । विधात्यासी भुलविलें ॥४९॥

जगाचिया परम हिता । लागीं नाना चरित्रकथा ।

करिता जालासी श्रीअनंता । कृष्णनाथा निजजनका ॥२५०॥