श्रीएकनाथी भागवत

ज्ञानेश्वरीतील उणीव एकनाथी भागवताने भरून काढली.


श्लोक १४ वा

श्रीउद्धव उवाच ।

योगेश योगविन्यास योगात्मन्योगसम्भव ।

निःश्रेयसाय मे प्रोक्तस्त्यागः संन्यासलक्षणः ॥१४॥

ऐकें योगियांच्या योगपती । योग्यांचा ठेवा तूं श्रीपती ।

योगीं प्रगट तूं योगमूर्ती । योगउत्पत्ती तूजपासीं ॥६३॥

मज मोक्षासी कारण । त्यागु संन्यासलक्षण ।

बोलिलासी तो अति कठिण । परम दारुण हा त्यागू ॥६४॥