श्रीएकनाथी भागवत

ज्ञानेश्वरीतील उणीव एकनाथी भागवताने भरून काढली.


श्लोक ३३ व ३४ वा

पृथिवी वायुराकाशमापोऽग्निश्चन्द्रमा रविः ।

कपोतोऽजगरः सिन्धुः पतङ्गो मधूकृद्गजः ॥३३॥

मधुहा हरिणो मीनः पिङ्गला कुररोऽर्भकः ।

कुमारी शरकृत्सर्प ऊर्णनाभिः सुपेशकृत् ॥३४॥

गुरु सांगेन अशेष । संख्याप्रमाण चोवीस ।

त्यांचीं नांवें तूं परिस । सावकाश सांगेन ॥४६॥

पृथ्वी वायु आकाश । अग्नि आप सितांश ।

सातवा तो चंडांश । कपोता परिस आठवा ॥४७॥

अजगर सिंधु पतंग । मधुमक्षिका गज भृंग ।

हरिण मीन वेश्या साङ्ग । नांवें सुभग पिंगला ॥४८॥

टिटवी आणि लेंकरूं । कुमारी आणि शरकारु ।

सर्प कातणी पेशस्करु । इतुकेन गुरु चोवीस ॥४९॥

पावावया तत्त्व पंचविसावें । चोविसां गुरूंसी उपासावें ।

विवेकयुक्तिस्वभावें । गुरु भजावे निजबुद्धीं ॥३५०॥

ठाकावया निजबोधासी । निजविवेकें अहर्निशीं ।

गुरुत्व देऊनि अनेकांसी । निजहितासी गुरु केले ॥५१॥

कोण युक्ति कोण विचारु । कोणें लक्षणें कोण गुरु ।

केला तोही निजनिर्धारु । सविस्तारु परियेसीं ॥५२॥