श्रीएकनाथी भागवत

ज्ञानेश्वरीतील उणीव एकनाथी भागवताने भरून काढली.


श्लोक ३५ वा

एते मे गुरवो राजन् चतूर्विंशतिराश्रिताः ।

शिक्षावृत्तिभिरेतेषामन्वशिक्षमिहात्मनः ॥३५॥

ऐकें राजवर्य नृपती । विवेकधवलचक्रवर्ती ।

गुरुसंख्या तूजप्रती । यथानिगुतीं सांगितली ॥५३॥

यांचिया शिक्षिता वृत्ती । शिकलों आपुलिया युक्तीं ।

मग पावलों आत्मस्थिती । विकल्पभ्रांती सांडूनी ॥५४॥