श्रीएकनाथी भागवत

ज्ञानेश्वरीतील उणीव एकनाथी भागवताने भरून काढली.


श्लोक ५३ वा

कपोतः कश्चनारण्ये कृतनीडो वनस्पतौ ।

कपोत्या भार्यया सार्धमुवास कतिचित्समाः ॥५३॥

कपोतीचें स्नेह गोड । धरोनी स्त्रीसुखाची चाड ।

वनीं वृक्ष पाहोनियां गूढ । करी नीड कपोता ॥५२॥

तेणें वनचरें वनस्थळीं । नीडामाजीं स्त्रीमेळीं ।

वासु केला बहुकाळीं । भार्ये जवळी भूलला ॥५३॥