श्रीएकनाथी भागवत

ज्ञानेश्वरीतील उणीव एकनाथी भागवताने भरून काढली.


श्लोक ६५ वा

कपोती स्वात्मजान्वीक्ष्य बालकान् जालसंवृतान् ।

तानभ्यधावत्क्रोशन्ती क्रोशतो भृशदूःखिता ॥६५॥

तंव काळजाळीं एके वेळें । कपोती बांधली देखे बाळें ।

तोंड घेऊनि पिटी कपाळें । आक्रोशें लोळें दुःखित ॥९९॥

बाळें चरफडितां देखे जाळीं । आक्रंदोनि दे आरोळी ।

बाळांसन्मुख धावें वेळोवेळीं । दुःखें तळमळी दुःखित ॥६००॥