श्रीएकनाथी भागवत

ज्ञानेश्वरीतील उणीव एकनाथी भागवताने भरून काढली.


श्लोक ६६ वा

सासकृत्स्नेहगुणिता दीनचित्ताजमायया ।

स्वयं चाबध्यत शिचा बद्धान्पश्यन्त्यपस्मृतिः ॥६६॥

दुःख द्यावया भ्रतारासी । आक्रंदें कपोती चालिली कैसी ।

शतगुणें स्नेहो वाढला तिसी । मृतपुत्रांसी देखोनि ॥१॥

पुत्रस्नेहें केलें वेडें । गुण आठ‍आठवूनि रडे ।

हिताहित न देखे पुढें । बळेंचि पडे जाळांतु ॥२॥

मायामोहें भुलली कैसी । जेथ बांधलें देखे पुत्रासी ।

ते जाळीं घाली आपणासी । मोहें पिशी ते केली ॥३॥