श्रीएकनाथी भागवत

ज्ञानेश्वरीतील उणीव एकनाथी भागवताने भरून काढली.


श्लोक २ रा

श्रीउद्धव उवाच ।

कया धारणया कास्वित् कथं वा सिद्धीरच्युत ।

कति वा सिद्धयो ब्रूहि योगिनां सिद्धीदो भवान् ॥२॥

कोण्या धारणा कोण सिद्धी । ते सांगावी विधानविधि ।

संख्या किती सकळ सिद्धी । तेंही कृपानिधी सांगिजे ॥३५॥

या सकळ सिद्धींची कथा । तूं एक जाणता तत्त्वतां ।

ते मज सांगिजे जी अच्युता । तूं सिद्धीदाता योगियां ॥३६॥