श्रीएकनाथी भागवत

ज्ञानेश्वरीतील उणीव एकनाथी भागवताने भरून काढली.


श्लोक १८ वा

श्वेतद्वीपपतौ चित्तं शुद्धेधर्ममये मयि ।

धारयन्‍ श्वेततां याति षडूर्मिरहितो नरः ॥१८॥

सांडूनि कार्येंसीं रजतमें दूरी । जो मी सत्त्वाधिष्ठाता श्रीहरी ।

त्या माझी जो धारणा धरी । अखंडाकारी सर्वदा ॥७॥

तो माझेनि सत्त्वे सत्त्ववंतू । होय षडूर्मींसीं रहितू ।

शोक मोह जरा मृत्यू । क्षुधा तृषा हातू लावूं न शके ॥८॥