श्रीएकनाथी भागवत

ज्ञानेश्वरीतील उणीव एकनाथी भागवताने भरून काढली.


श्लोक २७ वा

यो वै मद्‍भावमापन्न ईशितुर्वशितुः पुमान् ।

कुतश्चिन्न विहन्येत तस्य चाज्ञा यथा मम ॥२७॥

जो कां मी सर्वांचा नियंता । स्वयें स्वतंत्र तत्त्वतां ।

त्या माझें ध्यान करितां । मद्‍भावता उपतिष्ठे ॥४७॥

मीचि भगवंत सुनिश्चित । ऐसें बोधा आलें यथास्थित ।

त्याची आज्ञा सुरवर वंदित । पशुपक्षी नुल्लंघित ते आज्ञा ॥४८॥

जैशी माझी आज्ञा सर्वांवरी । तैशी त्याची आज्ञा चराचरीं ।

कोणी नुल्लंघिती तिळभरी । ते आज्ञासिद्धी खरी तो लाहे ॥४९॥

एवं या गुणहेतुसिद्धी दहाही । धारणायुक्त सांगीतल्या पाहीं ।

आतां क्षुद्र पंचसिद्धी ज्याही । तुज मी त्याही सांगेन ॥५०॥