श्रीएकनाथी भागवत

ज्ञानेश्वरीतील उणीव एकनाथी भागवताने भरून काढली.


श्लोक २८ वा

मद्‍भक्त्या शुद्धसत्त्वस्य योगिनो धारणाविदः ।

तस्य त्रैकालिकी बुद्धिर्जन्ममृत्यूपबृंहिता ॥२८॥

जगाचें उत्पत्तिस्थितिनिदान । सत्यत्वें असे मज‍अधीन ।

त्या माझ्या ठायीं करितां भजन । अंतःकरण अतिशुद्ध ॥५१॥

ते शुद्ध अंतःकरणीं जाण । भूत भविष्य वर्तमान ।

जगाचें जन्म भोग मरण । हे त्रिकाळज्ञान सिद्धी प्रकटे ॥५२॥