श्रीएकनाथी भागवत

ज्ञानेश्वरीतील उणीव एकनाथी भागवताने भरून काढली.


श्लोक ३ रा

येषु येषु च भावेषु भक्त्या त्वां परमर्षयः ।

उपासीनाः प्रपद्यन्ते संसिद्धिं तद् वदस्व मे ॥३॥

ज्या ज्या तुझ्या विभूती । पूर्वीं उपासिल्या संतीं ।

दृढ भावें करोनियां भक्ती । तुझी स्वरूपप्राप्ती पावलें ॥९१॥

त्या सकळ तुझ्या विभूती । कवण स्थिती कवण व्यक्ती ।

कवण भाव कवण गती । हें निश्चितीं मज सांगा ॥९२॥

म्हणसी सकळ भूतांप्रती । तूंचि वोळख माझ्या विभूती ।

तरी ते तुझी अतर्क्य स्थिती । न कळे श्रीपती आमुचेनि ॥९३॥