श्रीएकनाथी भागवत

ज्ञानेश्वरीतील उणीव एकनाथी भागवताने भरून काढली.


श्लोक १३ वा

इन्द्रोऽहं सर्वदेवानां वसूनामस्मि हव्यवाट् ।

आदित्यानामहं विष्णू रुद्राणां नीललोहितः ॥१३॥

देवांमाजी मी इंद्र जाण । वसूंमाजीं मी हुताशन ।

आदित्यांमाजी मी वामन । रुद्रांमाजी जाण मी नीललोहितू ॥७७॥