श्रीएकनाथी भागवत

ज्ञानेश्वरीतील उणीव एकनाथी भागवताने भरून काढली.


श्लोक १४ वा

ब्रह्मर्षीणां भृगुरहं राजर्षीणामहं मनुः ।

देवर्षीणां नारदोऽहं हविर्धान्यस्मि धेनुषु ॥१४॥

शापूनि ब्रह्म अपूज्य केला । शिवाचा नैवेद्य त्यागविला ।

विष्णू हृदयीं लाता हाणितला । भृगु वाखाणिला श्रीवत्सें ॥७८॥

ब्रह्मऋषींमाजीं संपन्न । भृगु तो मी म्हणे श्रीकृष्ण ।

मनुस्वरूपें मी आपण । राजर्षि जाण मुख्यत्वें ॥७९॥

देवर्षीमाजीं मुनि नारद । तोही मी म्हणे गोविंद ।

कामधेनु अतिशुद्ध । स्वरूप प्रसिद्ध तें माझें ॥१८०॥