श्रीएकनाथी भागवत

ज्ञानेश्वरीतील उणीव एकनाथी भागवताने भरून काढली.


श्लोक १७ वा

ऐरावतं गजेन्द्राणां यादसां वरुणं प्रभुम् ।

तपतां द्युमतां सूर्यं मनुष्याणां च भूपतिम् ॥१७॥

ऐरावत जो गजेंद्र । तो मी म्हणे यादवेंद्र ।

वरुण जो जळचरेंद्र । तें म्हणे उपेंद्र स्वरूप माझे ॥८५॥

स्वप्रभा प्रकाशनिष्ठ । जग प्रकाशूनि उद्‍भट ।

तो सूर्य मी म्हणे वैकुंठ । अतितिखट निजतेजें ॥८६॥

मनुष्यांमाजीं जो भोगी क्षिती । सर्व भूती ज्याच्या हातीं ।

ज्यातें बोलती भूपती । ते माझी विभूती हरि म्हणे ॥८७॥