श्रीएकनाथी भागवत

ज्ञानेश्वरीतील उणीव एकनाथी भागवताने भरून काढली.


श्लोक २० वा

तीर्थानां स्रोतसां गङ्गा समुद्रः सरसामहम् ।

आयुधानां धनुरहं त्रिपुरघ्नो धनुष्मताम् ॥२०॥

तीर्थसरितांमाजीं गांग । तें मी म्हणे श्रीरंग ।

तडागीं श्रेष्ठ तडाग । समुद्र सांग मी म्हणे हरी ॥९२॥

आयुधीं धनुष्य हतियेर । तें मी म्हणे सारंगधर ।

त्रिपुरारि मी धनुर्धर । जेणें केला संहार त्रिपुराचा ॥९३॥