श्रीएकनाथी भागवत

ज्ञानेश्वरीतील उणीव एकनाथी भागवताने भरून काढली.


श्लोक २१ वा

धिष्ण्यानामस्म्यहं मेरुर्गहनानां हिमालयः ।

वनस्पतीनामश्वत्थ ओषधीनामहं यवः ॥२१॥

त्रिभुवन निवासस्थान महामेरू । तो मी म्हणे धराधरू ।

दुर्गमत्वें अतिदुर्धरू । तो मी हिमगिरिवरू म्हणे कृष्ण ॥९४॥

वृक्षांमाजीं जो अश्वत्थू । तो मी म्हणे श्रीकृष्णनाथू ।

ओषधींमाजीं अतिविख्यातू । यव मी अच्युतू म्हणे वेगें ॥९५॥