श्रीएकनाथी भागवत

ज्ञानेश्वरीतील उणीव एकनाथी भागवताने भरून काढली.


श्लोक २२ वा

पुरोधसां वसिष्ठोऽहं ब्रह्मिष्ठानां बृहस्पतिः ।

स्कन्दोऽहं सर्वसेनान्यामग्रण्यां भगवानजः ॥२२॥

श्रीरामपौरोहित्यें श्रेष्ठ । देवो म्हणे तो मी वसिष्ठ ।

वेदवेत्त्यांमाजीं उद्‍भट । सुरगुरु वरिष्ठ मी उद्धवा ॥९६॥

स्कंद सेनापतिशिरोमणी । तो मी म्हणे चक्रपाणी ।

स्वधर्मप्रवर्तकू अग्रगणी । वंद्य ब्राह्मणीं तो ब्रह्मा मी ॥९७॥