श्रीएकनाथी भागवत

ज्ञानेश्वरीतील उणीव एकनाथी भागवताने भरून काढली.


श्लोक ३० वा

रत्‍नानां पद्मरागोऽस्मि पद्मकोशः सुपेशसाम् ।

कुशोऽस्मि दर्भजातीनां गव्यमाज्यं हविःष्वहम् ॥३०॥

रत्नांमाजी जो पद्मराग । तो मी म्हणे श्रीरंग ।

मनोहरांमाजी अव्यंग । हरि म्हणे सांग पद्मकळा तो मी ॥३६॥

दशदर्भांमाझारीं । कुश तो मी म्हणे श्रीहरी ।

सकळ हविषांच्या शिरीं । गोघृत श्रीहरि स्वयें मी म्हणे ॥३७॥