श्रीएकनाथी भागवत

ज्ञानेश्वरीतील उणीव एकनाथी भागवताने भरून काढली.


श्लोक ३४ वा

अपां रसश्च परमस्तेजिष्ठानां विभावसुः ।

प्रभा सूर्येन्दुताराणां शब्दोऽहं नभसः परः ॥३४॥

उदकाच्या ठायीं 'रस' सुरसु । तो मी म्हणे श्रीनिवासु ।

तेजिष्टांमाजीं जो 'प्रकाशु' । तो मी म्हणे निजतेजसु उद्धवा ॥६१॥

चंद्रसूर्यतारांच्या ठायीं । जें 'तेज' तें माझें पाहीं ।

'अनाहतशब्द' तो मीही । जो गगनासीं कंहीं नातळे ॥६२॥