श्रीएकनाथी भागवत

ज्ञानेश्वरीतील उणीव एकनाथी भागवताने भरून काढली.


श्लोक ४१ वा

एतास्ते कीर्तिताः सर्वाः सङ्क्षेपेण विभूतयः ।

मनोविकारा एवैते यथा वाचाभिधीयते ॥४१॥

केवळ संकोच संक्षेपस्थितीं । म्यां सांगितल्या ज्या विभूति ।

त्या मनोविकारप्रतीती । जाण निश्चितीं उद्धवा ॥९२॥

साधकांचे साधनस्थिती । सत्य जाणाव्या माझ्या विभूती ।

विचारितां परमार्थगतीं । तरी या कल्पिती मनोजन्या ॥९३॥

माझें स्वरूप अद्वैत जाण । नाहीं नाम रूप गुण वर्ण ।

तेथ नाना विभूतिलक्षण । मिथ्या जाण वाचिक ॥९४॥