श्रीएकनाथी भागवत

ज्ञानेश्वरीतील उणीव एकनाथी भागवताने भरून काढली.


श्लोक ४६ वा

एवंविधो नरपतिर्विमानेनार्कवर्चसा ।

विधूयेहाशुभं कृत्स्नं इंद्रेण सह मोदते ॥४६॥

यापरी जो कां नृपती । इहलोकींच्या राज्यप्राप्ती ।

अधर्म नाशोनि स्वधर्मस्थितीं । स्वर्ग प्राप्ती तो पावे ॥५१॥

`राज्याचे अंतीं नरक' । ऐसें बोलती ज्ञाते लोक ।

ते निरयगती नाशोनि देख । स्वधर्में परलोक पावले ॥५२॥

ते स्वर्गलोकीं गा जाण । अर्कप्रकाशासम विमान ।

तेथ आरूढोनि आपण । इंद्रसमान सुख भोगिती ॥५३॥

गृहस्थाश्रम अतिविषय । तेथें आचरतां स्वधर्म ।

वोडवे जैं कां दुर्गम । ते आपद्धर्म अवधारीं ॥५४॥