श्रीएकनाथी भागवत

ज्ञानेश्वरीतील उणीव एकनाथी भागवताने भरून काढली.


श्लोक २९ वा

किं दानं किं तपः शौर्यं किं सत्यमृतमुच्यते ।

कस्त्यागः किं धनं चेष्टं को यज्ञः का च दक्षिणा ॥२९॥

कोण `दान' कोण `तप' येथ । `शौर्य' कोण कैसें तें `सत्य' ।

`ऋत' जें कां म्हणिजेत । तेंही निश्चित सांगावें ॥६३॥

कोणता जी `त्याग' येथें । इष्ट `धन' कोण पुरुषातें ।

`यज्ञ' कशातें म्हणिजेतें । `दक्षिणा' तेथें ते कायी ॥६४॥