श्रीएकनाथी भागवत

ज्ञानेश्वरीतील उणीव एकनाथी भागवताने भरून काढली.


श्लोक ३० वा

पुंस किंस्विद्‍बलं श्रीमन् दया लाभश्च केशव ।

का विद्या ह्रीः परा का श्रीः किं सुखं दुःखमेव च ॥३०॥

पुरुषासी `बळाची' कोण शक्ती । `दया' बोलिजे कोणे स्थितीं ।

`लाभ' तो कोण गा श्रीपती । सांग कृपामूर्ती केशवा ॥६५॥

`विद्या' म्हणावें कशातें । `लज्जा' कोणे ठायीं वर्ते ।

उत्कृष्ट `लक्ष्मी' कोण येथें । तेही अनंतें सांगावी ॥६६॥

येथील कोण पां कैसें `सुख' । मज सांगावें कृपापूर्वक ।

सुखाचे सांगाती जें `दुःख' । त्याचेंही रूपक सांगावें ॥६७॥