श्रीएकनाथी भागवत

ज्ञानेश्वरीतील उणीव एकनाथी भागवताने भरून काढली.


श्लोक १ ला

उद्धव उवाच-विधिश्च प्रतिषेधश्च, निगमो हीश्वरस्य ते ।

अवेक्षतेऽरविन्दाक्ष, गुणदोषं च कर्मणाम् ॥१॥

कमलनयना श्रीकृष्णा । विधिनिषेधलक्षणा ।

दाखवीतसे दोषगुणां । तुझी वेदाज्ञा प्रसिद्ध ॥२३॥

तुझिया वेदाचे वेदविधीं । गुणदोषीं जडली बुद्धी ।

ते मी सांगेन प्रसिद्धी । कृपानिधी अवधारीं ॥२४॥