श्रीएकनाथी भागवत

ज्ञानेश्वरीतील उणीव एकनाथी भागवताने भरून काढली.


श्लोक १९ वा

धार्यमाणं मनो यर्हि, भ्राम्यदाश्वनवस्थितम् ।

अतेन्द्रितोऽनुरोधेन, मार्गेणात्मवशं नयेत् ॥१९॥

स्वरुपीं लावितां अनुसंधान । जरी निश्चळ नव्हे मन ।

न सांडी आपुला गुण । चंचळपण स्वभावें ॥१॥

साधक आळसें विकळे । कां आठवी विषयसोहळे ।

तैं स्वरुपींहूनि मन पळे । निज चंचळें स्वभावें ॥२॥

तेथें नेहटूनि आसन । स्वयें होऊनि सावधान ।

स्मरोनि सद्गुरुचे चरण । स्वरुपीं मन राखावें ॥३॥

नेदितां विषयदान । हटावलें क्षोभे मन ।

तरी न सांडोनि अनुसंधान । द्यावें अन्नपान विधानोक्त ॥४॥

(आशंका) ॥ ’सर्पा पाजिलें पीयूष । तेंचि परतोनि होय विष ।

तेवीं मनासी देतां विषयसुख । अधिक देख खवळेल’ ॥५॥

तरी ऐसें द्यावें विषयदान । जेणें आकळलें राहे मन ।

तेचि अर्थीचें निरुपण । स्वयें नारायण सांगत ॥६॥