श्रीएकनाथी भागवत

ज्ञानेश्वरीतील उणीव एकनाथी भागवताने भरून काढली.


श्लोक २१ वा

तया विरहितः साधो जन्तुः शून्याय कल्पते ।

ततोऽस्य स्वार्थविभ्रंशो मूर्च्छितस्य मृतस्य च ॥२१॥

विवेकशून्य स्तब्धवत । तेथ विषयो ना परमार्थ ।

न कळे सन्मार्गपंथ । आत्मघात पदोपदीं ॥१९॥

केवळ जड मूढ हो‍ऊनी । जेवीं कां मूर्च्छित प्राणी ।

तैसेपरी स्तब्ध हो‍ऊनी । अज्ञानपणीं श्रमला ॥२२०॥

यापरी जीत ना मेला । जड मूढ हो‍ऊनी ठेला ।

थित्या निजस्वार्था मुकला । अंगीं वाजला अनर्थु ॥२१॥