श्रीएकनाथी भागवत

ज्ञानेश्वरीतील उणीव एकनाथी भागवताने भरून काढली.


श्लोक ५ वा

नैतदेवं यथात्थ त्वं, यदहं वच्मि तत्तथा ।

एवं विवदतां हेतुं, शक्तयो मे दुरत्ययाः ॥५॥

माझे मायेचें प्रबळ बळ । तेणें अभिमान अतिसबळ ।

वाढवूनि युक्तीचें वाग्जाळ । करिती कोल्हाळ वाग्वादी ॥६५॥

प्रबळ शास्त्रश्रवणाभिमान । तुझें वचन तें अप्रमाण ।

मी बोलतों हेंचि प्रमाण । पत्रावलंबन केलें असे ॥६६॥

सत्त्वरजादि गुणोत्पत्ती । माझे मायेच्या अनंत शक्ती ।

तेणें गुणक्षोभें विवादती । स्वमतव्याप्तीअभिमानें ॥६७॥