श्रीएकनाथी भागवत

ज्ञानेश्वरीतील उणीव एकनाथी भागवताने भरून काढली.


श्लोक ६ वा

यासां व्यतिकरादासीद्विकल्पो वदतां पदम् ।

प्राप्ते शमदमेऽप्येति, वादस्तमनुशाम्यति ॥६॥

कां गुणक्षोभें अभिमान । विकल्प उपजवी गहन ।

विकल्पें युक्तीचें छळण । करी आपण अतिवादें ॥६८॥

सांडितां गुणक्षोभविलास । रजतमांचा होय र्‍हास ।

सत्त्ववृत्तीचा निजप्रकाश । अतिउल्हास शमदमांचा ॥६९॥

शमदमांचे निजवृत्ती । संकल्प-विकल्पेंसीं जाती ।

वाद अतिवाद उपरमती । जेवीं सूर्याप्रती आंधारें ॥७०॥

सर्वज्ञ ज्ञाते जे गा होती । ते नाना तत्त्वांच्या तत्त्वोक्ती ।

स्वयें विवंचूं जाणती । ऐक तुजप्रती सांगेन ॥७१॥