श्रीएकनाथी भागवत

ज्ञानेश्वरीतील उणीव एकनाथी भागवताने भरून काढली.


श्लोक ४९ वा

तरोर्बीजविपाकाभ्यां यो विद्वान् जन्मसंयमौ ।

तरोर्विलक्षणो द्रष्टा एवं द्रष्टा तनोः पृथक् ॥४९॥

बीजपरिपाकें वाढले वृक्षीं । पर्वत त्या वृक्षाचा साक्षी ।

तो पर्वत वृक्षच्छेदनें नव्हे दुःखी । तेवीं द्रष्टा साक्षी देहाचा ॥८७॥

द्रष्टा साक्षी देहमात्रासी । ते देहधर्म न लगती द्रष्ट्यासी ।

तो देहीं असोनि विदेहवासी । भवबंध त्यासी स्पर्शेना ॥८८॥

हा अर्थ नेणोनि अविवेकी । अतिबद्ध जाहले ये लोकीं ।

तोचि अर्थ पांच श्लोकीं । श्रीकृष्ण स्वमुखीं सांगत ॥८९॥;