श्रीएकनाथी भागवत

ज्ञानेश्वरीतील उणीव एकनाथी भागवताने भरून काढली.


श्लोक २० वा

भिद्यन्ते भ्रातरो दाराः पितरः सुहृदस्तथा ।

एकास्निग्धाः काकिणिना सद्यः सर्वेऽरयः कृताः ॥२०॥

इष्टमित्रांचें मित्रत्व मोडी । बंधुबंधूंचा स्नेह विघडी ।

सुहृदांचें सौजन्य तोडी । फुटकी कवडी अर्थाची ॥५२॥

पित्यापुत्रांमाजीं विरोध । स्त्रीपुत्रांमाजीं द्वंद्व ।

तो हा जाण अर्थसंबंध । विभांडी हार्द सुहृदांचें ॥५३॥

काकिणी म्हणजे वीसकवडी । ते आप्तांचा स्नेह तोडी ।

त्यांतील एक फुटकी कवडी । भेदू पाडी सुहृदांसी ॥५४॥