श्रीएकनाथी भागवत

ज्ञानेश्वरीतील उणीव एकनाथी भागवताने भरून काढली.


श्लोक ४२ वा

परिभूत इमां गाथामगायत नराधमैः ।

पातयद्भिः स्वधर्मस्थो धृतिमास्थाय सात्त्विकीम् ॥४२॥

दुर्जनांच्या उपद्रवाहातीं । निजशांति न सांडीच यती ।

धरोनियां सात्त्विकी धृती । स्वधर्मस्थिती न ढळेचि ॥७३॥;

तेणें भिक्षूनें गायिली गाथा । ते तुज मी सांगेन आतां ।

उद्धवा अतिसावधानता । तो बोध तत्त्वतां अवधारीं ॥७४॥

तो बोधू धरितां चित्तीं । द्वंद्वसाम्या पावे स्थिती ।

सहजें उल्हासे निजशांति । सायुज्यमुक्ती घर रिघे ॥७५॥

जगीं उद्धवाचें भाग्य पूर्ण । ज्यासी श्रीकृष्ण करी सावधान ।

काय बोलिला भिक्षु आपण । तें निरुपण अवधारीं ॥७६॥;