श्रीएकनाथी भागवत

ज्ञानेश्वरीतील उणीव एकनाथी भागवताने भरून काढली.


श्लोक ४२ वा

अभ्यर्च्याथ नमस्कृत्य, पार्षदेभ्यो बलिं हरेत् ।

मूलमन्त्रं जपेदब्रह्म, स्मरन्नारायणात्मकम् ॥४२॥

यापरी होम विधियुक्त अर्चन । करुनि करावें साष्टांग नमन ।

मग देवाचे जे पार्षदगण । त्यांसी बळिहरण कल्पावें ॥२२॥

मग बाह्यप्रतिमापूजास्थान । तेथें येवोनियां आपण ।

मूलमंत्राचें स्मरण । ध्यानयुक्त जाण करावें ॥२३॥

पूज्य-पूजक अभिन्न । परात्पर जो कां नारायण ।

ते परब्रह्मीं लावूनी मन । घालावें आसन सावधानवृत्तीं ॥२४॥

ध्यानीं जंव स्थिरावे मन । तंव स्थिर राखावें आसन ।

तेथूनि उपरमल्या मन । पुढें पूजाविधान हरि सांगे ॥२५॥