श्रीएकनाथी भागवत

ज्ञानेश्वरीतील उणीव एकनाथी भागवताने भरून काढली.


श्लोक १० वा

उद्धव उवाच -

नैवात्मनो न देहस्य संसृतिर्द्रष्ट्टदृश्ययोः ।

अनात्मस्वदृश्योरीश कस्य स्यादुपलभ्यते ॥१०॥

आत्मा नित्यमुक्त चिद्धन । त्यासी न घडे भवबंधन ।

देह जढ मूढ अज्ञान । त्यासी संसार जाण घडेना ॥२२॥

एथ भवबंधन हृषीकेशी । सांग पां बाधक कोणासी ।

जरी तूं संसार नाहीं म्हणसी । तो प्रत्यक्ष जगासी जडलासे ॥२३॥

आत्म्यासी विचारितां जाण । भवबंधा न दिसे स्थान ।

येचि अर्थीचें न घडतेपण । उद्धव आपण सांगत ॥२४॥