श्रीएकनाथी भागवत

ज्ञानेश्वरीतील उणीव एकनाथी भागवताने भरून काढली.


श्लोक २५ वा

स्त्रीबालावृद्धानादाय, हतशेषान् धनञ्जयः ।

इन्द्रप्रस्थं समावेश्य, वज्र तत्राभ्यषेचयत् ॥२५॥

एवं द्वारका जालिया निमग्न । उरले बाल वृद्ध स्त्रीजन ।

त्यांसी घेऊनियां अर्जुना । निघाला आपण इंद्रप्रस्था ॥९४॥

यादव प्रभासापर्यंत । गेले ते निमाले समस्त ।

उरले जे द्वारकेआंत । वज्रादिकांसमवेत अर्जुन निघे ॥९५॥

एवं घेऊनियां समस्तांसी । पार्थ आला इंद्रप्रस्थासी ।

राज्यधर यादववंशीं । तेथ वज्रासी अभिषेकी ॥९६॥

अनिरुद्धाचा पुत्र वज्र । यादववंशीं राज्यधर ।

अभिषेकूनि अर्जुनवीर । निघे सत्वर धर्माप्रती ॥९७॥