संत चोखामेळा - अभंग संग्रह २

संत चोखामेळा - अभंग संग्रह २


अद्वैत

कोण तो सोंवळा कोण तो वोवळा ।

दोहींच्या वेगळा विठ्‌ठल माझा ॥१॥

कोणासी विटाळ कशाचा जाहला । मुळींचा संचला सोंवळाची ॥२॥

पांचांचा विटाळ एकाचिये आंगा । सोंवळा तो जगामाजी कोण ॥३॥

चोखा म्हणे माझा विठ्‌ठल सोंवळा । अरुपें आगळा विटेवरी ॥४॥