नाम हें सोपें जपतां विठ्ठल । अवघेंचि फळ हाता लागे ॥१॥
योग याग जप तप अनुष्ठान । तीर्थ व्रत दान नाम जपतां ॥२॥
सुखाचें सुख नाहीं यातायाती । बैसोनी एकांतीं नाम स्मरा ॥३॥
चोखा म्हणे येणें साधेल साधन । तुटेल बंधन भवपाश ॥४॥