संत निवृत्तिनाथांचे अभंग

संत निवृत्तिनाथांचे अभंग


संत निवृत्तीनाथांचे अभंग

गगनवाड दृष्टी सर्व तत्त्व शेखीं । जीव शिव पोखी कारण सिद्ध ॥१॥

तेची हें सांवळें स्वरूप गोजिरें । कृष्णनाम खरें नंदाघरीं ॥२॥

पृथ्वीचें तळवट अनंत विराट । आपण वैकुंठ गोपीसंगे ॥३॥

निवृत्ति तप्तर लक्षते स्वानंद । नित्यता आनंद ब्रह्मानंदे ॥४॥