संत निवृत्तिनाथांचे अभंग

संत निवृत्तिनाथांचे अभंग


संत निवृत्तीनाथांचे अभंग

ज्याचे स्मरणें कैवल्य सांडणें । एका नामें होणें चतुर्भुज ॥ १ ॥

तें रूप वैकुंठ भोगिती गोकुळीं । नंदाचिये कुळीं बाळकृष्ण ॥ २ ॥

न संपडे ध्यानीं लावितां उन्मनी । तो गोपाळाचे कानीं सांगे मातु ॥ ३ ॥

निवृत्ति अरुवार कृष्णरूपी सेवी । मन ठाणदिवी ह्रदयामाजी ॥ ४ ॥