ब्रह्मादिक पूजा इच्छिती सहजा । जो गौळियांच्या काजा तिष्ठतुसे ॥१॥
देखिला वो माये चक्रभुज स्वाभावी । वारु ते वागवी अर्जुनाचे ॥२॥
याज्ञिक अर्पिती मंत्राच्या आहुती । तो द्रौपदियेप्रति भाजि मागे ॥३॥
निवृत्तिदैवत पूर्ण मनोरथ । पांडव कृतार्थ कृष्णनामें ॥४॥