संत निवृत्तिनाथांचे अभंग

संत निवृत्तिनाथांचे अभंग


संत निवृत्तीनाथांचे अभंग

गगन घोटींत उठि पृथ्वी सगळी दाटी । आपणचि पाठी कूर्म जाणा ॥१॥

कांसवितुसार अमृत सधर । भक्त पारावार तारियेले ॥२॥

उचलिती ढिसाळ सर्व हा गोपाळ । तो यशोदेचा बाळ नंदाघरीं ॥३॥

निवृत्ति सादर हरिरूप श्रीधर । आपण चराचर विस्तारला ॥४॥