संत निवृत्तिनाथांचे अभंग

संत निवृत्तिनाथांचे अभंग


संत निवृत्तीनाथांचे अभंग

निरपेक्षता मन अनाक्षर मौन्य । प्रकाश संपूर्ण तया ब्रह्मा ॥१॥

ऐसें रूप पाहा क्षरे दिशा दाहा । सर्वभावें मोहा एका कृष्णा ॥२॥

नित्यता अढळ नित्यपणें वेळे । विकाश आकळे नित्य तेजें ॥३॥

रूपस सुंदर पवित्राआगर । चोखाळ साकार पवित्रपणें ॥४॥

नेणें हें विषय आकार न माये । विकार न साहे तया रूपा ॥५॥

निवृत्ति तत्पर कृष्ण हा साकार । ॐतत्सदाकार हरि माझा ॥६॥