संत निवृत्तिनाथांचे अभंग

संत निवृत्तिनाथांचे अभंग


संत निवृत्तीनाथांचे अभंग

रसज्ञ रसाचार रसामाजी वसे । जीवन हें सोसे असोस होय ॥१॥

तें रूप स्वरूपाचें रूपींच वोळले । कंदर्पें घोळिले नंदाघरीं ॥२॥

नाहीं त्या आकार अवघाचि वैकुंठ । अद्वैत घनदाट ब्रह्ममय ॥३॥

निवृत्ति नितंब कृष्ण तो स्वयंभ श्रीमूर्तीचे बिंब दिसे सर्व ॥४॥