संत निवृत्तिनाथांचे अभंग

संत निवृत्तिनाथांचे अभंग


संत निवृत्तीनाथांचे अभंग

जेथें रूप रेखा नाहीं गुण देखा । चिदाकाश एका आपतत्त्व ॥१॥

तें रूप गोजिरें कृष्ण रूपें सांग । यशोदेचा पांग हरियेला ॥२॥

जेथें रजतम नाहीं तें निःसीम । अपशम दम पूर्णघन ॥३॥

निवृत्ति सार पा ब्रह्मसुख घन । सर्व जनार्दन गोपवेषें ॥४॥