संत निवृत्तिनाथांचे अभंग

संत निवृत्तिनाथांचे अभंग


संत निवृत्तीनाथांचे अभंग

मथनीं मथन मधुरता आपण । विश्वीं विश्व पूर्ण सदोदित ॥१॥

तें हे चतुर्भुज मुगुटवर्धन । सुंदर श्रीकृष्ण खेळतसे ॥२॥

दुमदुम पाणि दुमिळित ध्यानीं । दृढता निशाणीं काष्ठीं लागे ॥३॥

ध्रुवाद्य अढळ ब्रह्म हें अचळ । शोखिमायाजाळ निःसंदेहे ॥४॥

क्लेशादि कल्पना क्लेशनिवारणा । आपरूपें भिन्न होऊं नेदी ॥५॥

निवृत्ति कठिण गयनिप्रसाद । सर्वत्र गोविंद नंदाघरीं ॥६॥