संत निवृत्तिनाथांचे अभंग

संत निवृत्तिनाथांचे अभंग


Template Page

साधक बाधक न बाधी जनक । सर्व हरि एक आम्हां असे ॥ १ ॥

हरिविण नाहीं हरिविण नाहीं । हरि हेंचि पाही एकरूप ॥ २ ॥

हरि माझा जन हरि माझें धन । हरि हा निर्गुण सर्वांठायीं ॥ ३ ॥

निवृत्ति हरिलीळा दिनकाळ फळला । निमिशोनिमिषकळा हरिजाणे ॥ ४ ॥